डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती पूर्वतयारी बैठक रविवारी
बेळगांव:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती महोत्सवाची पूर्वतयारीची बैठक रविवार, ०९/०३/२०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे होणार आहे.
तसेच या बैठकीमध्ये २०२५ ते २०२६ सालाकरिता नवीन पदाधिकाऱ्यांची निवड येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी, सर्व अध्यक्ष, विविध दलित संघटनांचे पदाधिकारी, संघटना आणि युवक मंडळांचे पदाधिकारी, समाज नेते, महिला मंडळांचे पदाधिकारी, स्थिर प्रतिमा वाहनांचे पदाधिकारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी, या सर्वांनी सकाळी ठीक १०:३० वाजता बेळगाव येथील बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे बैठकीला हजर राहून सल्ला सूचना देण्याची आवाहन करण्यात आले आहे.*शाॅपिंग उत्सव, ईव्ही ऑटो एक्स्पो फर्निचर 7 ते 11 प्रदर्शनाचे आयोजन*
वरिष्ठ दलित नेते मल्लेश चौगुले, महामंडळ अध्यक्ष बसवराज रायोगोळ, सिद्धाप्पा कांबळे,मल्लेश कुरंगी, महादेव तळवार,जीवन कुरणे, गिर्याप्पा कोलकार, सिद्राय मैत्री, रामा चव्हाण,लोकेश चौगुले, महेश कोलकार,विनोद सोलापुरे, शिवपुत्र मैत्री,यल्लाप्पा कोलकर,संतोष हलगेकर यांनी कळविले आहे.