कडोली येथे काल स्वराची संकल्प महामेळावा उत्साहात पार पडला यावेळी या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिरूर मतदार संघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे उपस्थित होते.
यावेळी त्यांनी आपल्या भाषणात धर्मसत्ता आणि राजसत्तेमध्ये वरचढ नसावी वरचढ असावी तर ती रयतेच्या कल्याणाकरिता असावी असे प्रतिपादन केले. शिवराय ज्या मातीत घडले ती माती आपली आहे त्यामुळे शिवरायांचे हे योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादन केले.
तर यावेळी पुढे ते म्हणाले की तुम्हाला माय आणि मावशी या दोघींचे प्रेम लाभते आहे तुम्ही खूप भाग्यवान आहात मराठा कन्नड या दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला प्रतिसाद देता येतो .
यावेळी ते पुढे म्हणाले की स्वभाषेचा अभिमान म्हणजे परभाषेचा द्वेष कशाला पाहिजे आपण आपल्या धर्माचा अभिमान बाळगतो मात्र पर धर्माचा द्वेष कुठे करतो. त्याच पद्धतीने स्वभाषेचा अभिमान म्हणजे परभाषेचा द्वेष नाही. राष्ट्र टिकले तरच राज्य टिकते आणि राज्य टिकले तर राज्याची अस्मिता टिकते त्यामुळे राज्य टिकणे जास्त महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन यावेळी प्रमुख पाहुणे नात्याने बोलताना केले
यावेळी सदर स्वराज्य संकल्प महामेळावा कडोली येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पार पडला . यावेळी या कार्यक्रमाला युवा नेते राहुल जारकीहोळी कडोली दूरदेश्वर मठाचे गुरु बसवलिंग स्वामीजी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते
प्रारंभी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी या झालेल्या स्वराज संकल्प महामेळाव्याला यमकनमर्डी मतदारसंघातील हजारो शिवप्रेमी उपस्थित होते