शनिवारी कर्नाटक बंदची हाक कन्नड संघटनानी दिली आहे. कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती बस स्थानकावर जावून महाराष्ट्र एस टी च्या कंडक्टर आणि ड्रायव्हर यांना गुलाबाचे फुल देऊन उद्या कर्नाटक बंद असून तुमच्या बस कर्नाटकात आणू नका अशी विनंती केली.
बंद असताना बस जर कर्नाटकात आल्या तर त्याची जबाबदारी आपल्यावर नाही असा इशाराही कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी ड्रायव्हर, कंडक्टर यांना दिला. नंतर या कार्यकर्त्यांनी बस स्थानक परिसरातील दुकानदारांना देखील शनिवारी सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. https://dmedia24.com/good-luck-to-the-kolhapur-district-guardian-minister-at-akkol/
महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेवर बंदी घालावी, सगळीकडे कन्नड भाषेला प्राधान्य द्यावे, म्हादई योजना लवकर करावी अशा विविध मागण्यासाठी कन्नड संघटनानी कर्नाटक बंदची हाक दिली आहे.