यशस्वी होण्यासाठी सर्व ताकदीनिशी कष्ट करावे
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ भाऊराव काकतकर महाविद्यालय आणि ज्योती महाविद्यालय,माजी विद्यार्थी संघटना आणि अखिल भारतीय प्रगतशील सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि पालक मेळावा तसेच मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या व्याख्यान कार्यक्रमात प्राचार्य विद्या दळवी यांनी यशस्वी होण्यासाठी सर्व ताकदीनिशी कष्ट घ्यावे असे प्रतिपादन केले यावेळी त्या म्हणाले की कौशल्ययुक्त शिक्षण विद्यार्थ्यांना यश शिखरावर नेते. प्रत्येकाने हार्डवर्क खडतर अभ्यासाशिवाय आज पर्याय नाही. त्यामुळे खूप मेहनत घ्यावी कौशल युक्त शिक्षणाची आजच्या काळाची गरज आहे आनंदीमय जीवन जगण्यासाठी योग्य वेळी निर्णय घेऊन यशस्वी वाटचाल करायला हवी असे प्रतिपादन केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सहसचिव डॉक्टर दीपक देसाई होते.याप्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत व ईश्वस्तवनाने करण्यात आली. याप्रसंगी स्वागत भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एन पाटील यांनी केले. तर प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघटना समन्वयक प्राध्यापक डॉक्टर एम व्ही शिंदे यांनी केले.
त्यानंतर या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी माजी प्राचार्य डॉक्टर विद्या दळवी व समाजसेवक श्री आर वाय पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कल्याणकारी जीवनातील यशस्वी होण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी चौगुले यांनी केले तर आभार योगेश मुतगेकर यांनी मानले.