बेळगावात जिल्हास्तरीय पीयूसी रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते, पीयू बोर्ड बेळगाव, गोपाळजी इंटिग्रेटेड पीयू कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स तसेच जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १९ वर्षाखालील पीयूसी (I & II) जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा व निवड चाचणी २०२५ शिवगंगा स्पोर्ट्स क्लब स्केटिंग रिंक येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत ४० हून अधिक स्केटर्सनी सहभाग घेतला होता. उद्घाटन समारंभ कॉलेजच्या प्राचार्या भारती रांगणेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी स्पोर्ट्स इन्चार्ज महेंद्र पाटील, भाऊबली बाबनवर, अश्विनी कलमणी, सुनील सुनगार, संतोष कागीनावर, महेश भजंत्री, वीणा नायक तसेच प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, ऋषीकेश पसारे, सोहम हिंडलगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पालक व क्रीडाप्रेमींनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला उत्साह दिला.
पदक विजेते स्केटर्स :
१९ वर्षाखालील मुले :
श्री रोकडे – २ सुवर्ण
शौर्या भोसले – १ सुवर्ण, १ रौप्य
प्रसन्न वाणी – १ रौप्य, १ कांस्य
साई समर्थ अजाना – १ रौप्य
तेजस साळुंखे – १ कांस्य
समर्थ पाटील – १ कांस्य
१९ वर्षाखालील मुली :
करूणा वाघेला – ३ सुवर्ण
या स्पर्धेतून पुढील स्तरावर खेळाडूंची निवड करण्यात आली असून, विजेत्यांनी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवली आहे.