जिल्हास्तरीय पोषण मास २६ पासून
जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महिला आणि बाल कल्याण खाते तसेच जिल्हा बाल सुरक्षा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय पोषण मास आणि खात्याच्या नूतन संस्थांचे उद्घाटन दि. २६ रोजी करण्यात येणार आहे. कुमार गंधर्व रंगमंदिर येथे सकाळी ११ वा. याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून महिला आणि बाल कल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी आमदार राजू सेठ असतील. यासह जिल्ह्यातील मान्यवर, नेते उपस्थित राहणार आहेत.