बेळगांव:रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने 25 वर्षापासून मणक्याच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या गरजू महिलेला वॉटर बेड वितरण करण्यात आले.
शारीरिकदृष्ट्या अपंग महिलेकडून रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण कडे पाण्याच्या बेडची आवश्यकता असल्याची मागणी करण्यात आली होती.
दानशूर व्यक्तीच्या सहाय्याने बेळगाव दर्पण तर्फे त्या गरजू महिलेला वॉटर बेडचे तसेच ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष Rtn. रुपाली जनाज, माजी अध्यक्ष Rtn. आशा पाटील, तत्कालिन माजी अध्यक्ष Rtn. कोमल कोल्लीमठ, Rtn. सुरेखा मुम्मिगट्टी, Rtn.Dr. श्रीदेवी रेवण्णावर, Rtn. सविता वेसाने उपस्थित होत्