बेळगाव:आमदार राजू शेठ यांच्या कार्यालयामध्ये महिला व कुटुंब कल्याण विभागच्यावतीने तसेच मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून बेळगाव उत्तर मतदारसंघातील अंगणवाडी शिक्षकांना स्मार्टफोन वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच आमदार असिफ राजू शेठ यांनी बेळगाव उत्तर मतदार संघातील वरिष्ठ अंगणवाडी शिक्षकांचा शाल घालून सन्मान केला व त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. तसेच महिला व कुटुंब कल्याण विभाग च्या वतीने प्रथम चिकित्सा किट व साडी अंगणवाडी शिकवले जाणारे वार्षिक पुस्तक वितरण करण्यात आले.
याप्रसंगी आमदार बोलतांना म्हणाले की अंगणवाडी शिक्षिका तसेच सेविकांनी कोरोना काळात उत्तम प्रकारे काम केलेला आहे व त्यांचे काम आता सुलभ व्हावे यासाठी महिला आणि कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने त्यांना स्मार्टफोन येत आहे यातून रोज होणाऱ्या कामाची नोंदणी सरळ सरकार पर्यंत पोहोचेल असे ते म्हणाले.