मराठा मंडळ पदवी महाविद्यालया तर्फे सॅनिटरी पॅडचे वितरण
बेळगांव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात महिला दिनाच्या निमित्ताने बेळगांव मधील मागासवर्गिय वसाहतीत सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आला.
सॅलेटरी पॅड ची निर्मिती मराठा मंडळ, बेळगाव तर्फे करण्यात येते. या पॅडचे वितरण अनेक महाविद्यालयातील, शाळेच्या विद्यार्थीना तसेच गरीब मागासवर्गिय महिलांना मोफत देण्यात येते.महिला दिनाच्या निमित्ताने कणबर्गी, रामतीर्थ नगर येथील मागासवर्गिय वसाहतीत जाऊन सॅनिटरी पॅड बद्दलची जागृती महाविद्यालयाच्या महिला संघटना तर्फे करण्यात आली. एकलव्य नगर, सागर नगर, कणबर्गी, रामतीर्थ नगर वसाहतींमधील महिलांना सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करण्यात आले. त्यानंतर सिद्धेश्वर माध्यमिक शाळेच्या विद्यार्थीना सॅनिटरी पॅड बद्दलची माहिती देऊन शाळेतील सर्व विद्यार्थीना पॅड मोफत देण्यात आले.
या कार्यक्रमाला नँक समन्वय अधिकारी प्रा. आर. एम.तेली, ग्रंथपाल सुरेखा कामुले,डॉ. डी.एम. मुल्ला, डॉ.एच.जे. मोळेराखी, प्रा. राजु हट्टी, प्रा.अर्चना भोसले, प्रा. जगदीश यळ्ळुर,डॉ. आरती जाधव, प्रा. एस. आर.नाडगौडा, प्रा.भाग्यश्री चौगले प्रा. मनीषा चौगुले, प्रा.भाग्यश्री रोकडे, प्रा. सीमा खनगांवकर, प्रा.नूतन पाटील,प्रा.गौरी हलगेकर आदी प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
सॅनिटरी पॅडची निर्मिती आणि मोफत वितरण बद्दल मराठा मंडळ च्या अध्यक्षा राजश्री नागराजु यांचे सर्वत अभिनंदन होत आहे.