कपिलेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने प्रसादाचे वितरण
बेळगाव ,प्रतिनिधी:
शहरातील बसवाण्णा मंदिर आणि कपिलेश्वर मंदिराच्या यात्रेनिमित्त सोमवारी कपिलेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले.
काही भाविकांनी , सेवेकरींनी कपिलेश्वर मंदिराला गुढीपाडव्यानिमित्त दोन मोठी भांडी देणगी दाखल दिली आहेत. त्यानिमित्ताने बसवाण्णा मंदिर आणि कपिलेश्वर मंदिराच्या यात्रेनिमित्त या प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. https://dmedia24.com/singer-and-music-teacher-vinayak-more-family-of-kakade-foundation-on-behalf-of-the-foundation/
गुढीपाडव्याच्या निमित्ताने यात्रेनिमित्ताने भाविकांना मंदिराच्यावतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले. प्रसाद म्हणून रव्याची खीर वाटप करण्यात आली. यंदाचे हे प्रसाद वितरणाचे पहिलेच वर्ष असल्याचे ट्रस्टीनी सांगितले. त्याचबरोबर दरवर्षी प्रसादाचे वितरण करणार का ? असे विचारता त्याबाबत आमचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. किमान 20000 भाविकांना या प्रसादाचे वितरण करणार असल्याचे कपिलेश्वर मंदिराचे ट्रस्टी अजित जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. भक्तानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रसादाचा लाभ घेतला.