This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

December 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*कॅन्टोन्मेट मराठी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप*

*कॅन्टोन्मेट मराठी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप*
D Media 24

*कॅन्टोन्मेट मराठी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप* युवा समितीचा उपक्रम

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावच्यावतीने शनिवारी कॅम्प येथील कॅन्टोन्मेट मराठी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले . युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत मराठी शाळांमधील पहिलीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जाते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे होते . प्रारंभी युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन केले . युवा समिती सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली . २०१६-१७ मध्ये कॅन्टोन्मेट शाळेची पटसंख्या केवळ १२० होती . ‘ परंतु गुणात्मक शिक्षण व विविध उपक्रम राबवून शाळेने त्यामध्ये आज उल्लेखनीय वाढ झाली असून ३२० हून अधिक विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतला आहे . त्यांच्या या कार्याची दखल घेत युवा समितीच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शाळा पुरस्कार उत्तर विभागात शाळेने तीन वेळा पटकावलेला आहे.त्यामुळे या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले .

यावेळी मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे यांनी युवा समितीच्या कार्याचे कौतुक करून त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ सिद्धार्थ , सरचिटणीस श्रीकांत कदम,दत्ता पाटील, संतोष कृष्णाचे , शाळेचे शिक्षक उदय पाटील,धनाजी कुरणे , नीता गुंजीकर,श्रीकांत काटकर, मनीषा वड्डगोळ,तुषार कांबळे, राहुल कांबळेसह विद्यार्थी उपस्थित होते .


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply