श्री गुजराती नवरात्र उत्सव मंडळातर्फे सरकारी 12 नं. शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप. –
महाद्वार रोडच्या सरकारी 12 नंबर शाळेतील विद्यार्थ्यांना श्री गुजराती नवरात्र उत्सव मंडळ, गुजरात भवन, शास्त्रीनगर, बेळगांव यांच्यावतीने विद्यार्थ्यांना
वह्या आणि कंपास बाॕक्सचे वितरण करण्यात आले. श्रीयूत पंकजभाई शाह यांनी हे शैक्षणिक साहित्य पुरस्कृत केले होते.
शास्त्रीनगरमधील गुजरात भवन तर्फे या शैक्षणिक साहित्याचे वितरण गुजराती समाजाचे जेष्ठ व्यक्ती श्री लखमशीभाई लद्दड,
समाजाचे अध्यक्ष श्री रमेशभाई लद्दड, सचिव विजय भद्रा, कोषाध्यक्ष पंकज शहा, विश्वस्त भावेश चुडासमा व रितेश पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुजराती समाजाचे सन्माननीय सदस्य, 12 नंबर शाळेतील मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.