*पाच नंबर शाळेच्या विद्यार्थ्यांना टोप्याचे वाटप*
चव्हाट गल्लीतील पाच नंबर शाळेच्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थी संघाचे सभासद व उद्योजक श्री विनायक मोहिते यांनी सहलीला जाणाऱ्या सर्व 65 विद्यार्थ्यांना टोप्यांचे वाटप केले.
मंगळवारी शाळेत यानिमित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मराठा बँकेचे नवनिर्वाचित संचालक विश्वजीत हसबेसर होते. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दीपक किल्लेकर अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी मुख्याध्यापक श्री मुचंडीकर सर यांनी प्रास्ताविक करून सहलीची माहिती दिली. रवी नाईक यांनी विनायक मोहिते आणि विश्वजीत हसबे यांचा परिचय करून दिला.
श्री विनायक मोहिते यांनी विद्यार्थ्यांना टोप्या देऊन त्यांच्या सहलीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. विश्वजीत हसबे सरांनी सहलीचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री दीपक किल्लेकर यांनी विनायक मोहिते यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या टोप्या बद्दल त्यांचे आभार मानले. सदर कार्यक्रमास श्रीकांत कडोलकर व पालक वर्ग आवर्जून उपस्थित होता.