लोमॅक्स आश्रम व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ब्लॅकेटचे वितरण
बेळगांव:रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यांनी लोमॅक्स आश्रम मध्ये रोट्रॅक्ट क्लब ऑफ युवा दर्पण यांच्यासोबत कांबळी 5.0 ब्लँकेट वाटप करण्यात आले.रोट्रॅक्ट क्लब ऑफ युवा दर्पणचा हा प्रमुख प्रकल्प आहे.
समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो अशी भावना ठेवून समाजाची गरज ओळखून काहीतरी देणे हे प्रेमाचे प्रतिक असते. ती गरज ओळखून लोमॅक्स आश्रमात तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही गरजू लोकांना ब्लँकेट वितरण करण्यात आले.
याप्रसंगी आर.सी.बी दर्पण अध्यक्षा Rtn. रुपाली जनाज, कार्यक्रमाचे अध्यक्ष Rtn. शीला पाटील, Rtn. सुरेखा मुम्मीगट्टी, Rtn. लक्ष्मी चवली, Rtn. सविता वेसणे तसेच रोट्रॅक्ट क्लब युवा दर्पणचे अध्यक्ष संकल्प पाटील, आयपीपी आरटीआर अर्पिता निंगनुरे, माजी अध्यक्ष आरटीआर. प्रीती मन्निकेरी, रोट्रॅक्टर्स इव्हेंट चेअर आरटीआर संजना दोड्डामनी
<span;>सर्व उपस्थित होते.