*येळ्ळूर येथील मॉडेल शाळेत बेंचचे वितरण*
येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक मॉडेल शाळेला माजी विद्यार्थी श्री दत्ताबाळ महादेव काकतकर यांनी 30 बेंचचे वितरण केले. दत्ताबाळ महादेव काकतकर हे शाळेचे माजी विद्यार्थी असून शाळेतील विद्यार्थ्यांची खाली बसण्याची व्यवस्था पाहून जवळपास एक लाख दहा हजार किंमतीचे बेंच शाळेला देणगी दाखल दिले.
यावेळी शाळेच्या वतीने तसेच शतकोत्तर सुवर्ण महोत्सव कमिटीच्या वतीने पालक सभा बोलावून श्री दत्ताबाळ काकतकर आणि त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मी दत्ताबाळ काकतकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. शाळेची स्थापना इ.स. 1874 मध्ये झाली. सन 2024 मध्ये शाळेला 150 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने शाळेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव एप्रिल 26, 27 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. त्या निमित्ताने शाळेचे माजी विद्यार्थी शाळेला भेटी देऊन शाळेत असणाऱ्या अडचणी दूर करत आहेत. https://dmedia24.com/shahir-abhijit-kalekars-jagar-lok-culture-program-will-be-played-at-belgaum-literature-summit/
या सत्कार प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार, गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, शतकोत्तर सुवर्ण महोत्सव कमिटीचे अध्यक्ष रावजी महादेव पाटील, निधी संकलन कमिटीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य श्री सतीश बाळकृष्ण पाटील, ग्रामपंचायत सदस्य अरविंद पाटील, शशिकांत धुळजी, शिवाजी नांदुरकर, एस्.डी.एम्.सी. सदस्य ज्योतिबा उडकेकर, शशिकांत पाटील, जोतिबा पाटील, दिनेश लोहार, विजय धामणेकर, सदस्या श्रीमती अल्का कुंडेकर, श्रीमती मयुरी कुगजी, श्रीमती प्रियांका सांबरेकर,दिव्या कुंडेकर ,तसेच गोपाळ शहापूरकर, ,बी एन मजुकर, उत्तम खेमणाकर, मुख्याध्यापक श्री R. M. चलवादी हे होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस्.डी.एम्.सी. अध्यक्षा श्रीमती रूपा श्रीधर धामणेकर होत्या. यावेळी गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, सतीश बाळकृष्ण पाटील, दत्ता बाळ काकतकर, अरविंद पाटील, उत्तम खेमणाकर यांनी मार्गदर्शन केले. श्री एस्. बी. पाखरे यांनी सूत्रसंचालन, श्री एस्. आर. निलजकर यांनी प्रास्ताविक, श्रीमती एम्. एस्. मंडोळकर यांनी स्वागत, श्रीमती एम्. एम्. देसाई यांनी परिचय व सत्कार, श्रीमती एस्. एस्. बाळेकुंद्री यांनी आभार मानले.