बेळगाव:सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत. शहरांमध्ये कडाक्याची थंडी वाढली आहे. हे लक्षात घेऊन एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील बस स्थानकावर तसेच रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना बेडशीटचे वितरण करण्यात आले.
फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष धरेकर तसेच अवधूत तुडयेकर यांच्या सहकार्याने शहरांमधील रस्त्यावर वास्तव्यास असणाऱ्या बेघर लोकांना थंडीपासून बचाव करिता बेडशीटचे वाटप करण्यात आले.
सेंटर बस स्थानक,रेल्वे स्टेशन, कित्तूर चन्नम्मा सर्कल अशा विविध ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला.