बेळगावच्या फोरम फॉर इंटिग्रेटेड नैशनल सेक्युरिटी अर्थात फिन्स आणि प्रबुद्ध भारत तर्फे आंतरिक अशांति एवं विकल्प यावर विवीध श्रेत्रातील तीन विद्वानांचा चर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात कणेरी मठाचे पूज्य श्री अदृश्य काडसिध्देश्वर स्वामीजी कोल्हापूर ,आदरणीय न्यायाधीश श्री.ए.एस.पाच्छापुरे, बेळगाव आणि माजी आय जी पोलीस श्री.गोपाल होसूर बेंगळुरू भाग घेणार आहेत.
शुक्रवार दि.06.12.24 रोजी संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम उद्यमबाग येथील फौंड्री क्लस्टरच्या सभागृहात होणार आहे.हा कार्यक्रम सर्वांना खुला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा असे आवाहन फिन्स व प्रबुद्ध भारत तर्फे करण्यात आले आहे.