जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचा नामशेष करा प. पू. प्राणलिंग स्वामीजी
बुगटे अलुर येथे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध : मृतांना श्रद्धांजली
काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बुगटे अलुर येथे दुर्गा वाहिन व सधर्म चारिटेबल ट्रस्ट या संघटनांच्यावतीने गावाच्या वेसीवर निषेध करण्यात आला आला. यावेळी एक मिनिट स्तब्धता पाळून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.प.पू प्राणलिंग स्वामीजी म्हणाले की राष्ट्रासाठी रणभूमीत उतरूयला हवं, हल्ल्याचा बदला घेतल्याशिवाय हिंदुस्थानने शांत बसू नये, दहशतवादाचा खात्मा झालाच पाहिजे, शत्रूना सडेतोड उत्तरद्यायला हवीत, दहशतवाद्यांना कोणत्याही प्रकारची सहानुभूती नको त्यांच्या पिढ्यान-पिढ्या चां लक्षात राहील अशी शिक्षा करावी यासाठी शासनाला कशाची आवश्यकता असले तर देशातील तरुणाच्या सोबत आता तरुणी ही सिद्धा आसतील असे मत यावेळी श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प. पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी केले
सधर्म चारिटेबल ट्रस्ट आणि दुर्गा वहिनी च्या प्रमुख श्वेताताई हिरेमठ यांनी मनोगत व्यक्त करतेवेळी म्हणाले की
काश्मीरमधील पहलगाम या पर्यटनस्थळी भ्याड हल्ला करताना दहशतवाद्यांनी निरापराध भारतीय पर्यटकांची क्रूर हत्या केली. या घटनेमुळे प्रत्येक भारतीय हेलावून गेला आहे. अशा या घटनांचा पायबंध लागलीच पातला पाहिजे. या पुढील काळात अशा घटना घडू नयेत यासाठी दहशतवाद संपवलाच पाहिजे. अशा देश प्रेमाच्या आणि दहशतवाद विरोधाच्या तीव्र भावना घेऊन आज दुर्गा वाहिंनी व सधर्म चारिटेबल ट्रस्ट यांचा वतीने निषेध करत आहोत.
यावेळी गोरक्षण सेवा समिती चे प्रमुख सागर श्रीखंडे यांनी देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना विनंती केली की पाकिस्तान सोबत आता सर्जिकल स्ट्राइक नको तर युद्ध करून पाकिस्तानचे भारतात विलनीकरण करून घ्यावे व कायमचा पाकिस्तानचा विषय संपवावे असे मत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित तरुण तरुणींनी
पाकिस्तान मुर्दाबाद, नक्शे परसे नाम मिटा दो पापी पाकिस्तान का,दहशतवाद्यांना नको माफी, फक्त शिक्षा हवी दहशतवाद मुर्दाबाद भारत जिंदाबाद।, हल्ल्याचा बदला घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही.भारत मातेचा विजय घोष,शत्रूना सडेतोड उत्तर हवे,रक्ताने लिहिलेली गाथा विसरणार नाही,देशभक्तीची ज्वाला पेटली आहे, काश्मीर आमचाच आहे, दहशतवाद चिरडून टाकूया,दहशतवाद्यांना नाही माफी फक्त शिक्षा, शहिदांनो,आम्ही तुमच्या सोबत आहोत,अशा घोषणा देवून परिसर दान-दाऊन सोडण्या आला.उध्दव रावन यांनी प्रास्तविक केले सौ.माधुरी अलुरकर,सौ.संध्या गाडेकर,सौ.वेशाली पोतदार,सौ.वेशाळी खामकर,सौ.सपना चौगुले,सौ.प्रणाली दिवेकर, कु.शिवानी पाटील,कू.कादंबरी दिवेकर श्री,प्रदीप अलुरकर,विजय रावण, निलेश सुतार, अथर्व पोतदार,विवेक साळुंखे,तसेच जिजाऊ ग्रुप,छावा ग्रुप,दुर्गा माता दोड,तसेच राजकीय पक्षाचे कायकर्ते, सामाजिक संघ,संस्था,युवक मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व तरुण तरुणी मोठ्या सहभागी झाले होते.