मनगुती शिवाजी महाराज मूर्ती प्रकरणी महाराष्ट्राचे दिनेश कदम यांना जामीन मंजूर
मनगुती शिवाजी महाराज मूर्ती प्रकरणी महाराष्ट्राचे दिनेश कदम यांना जामीन मंजूर. मणगुती येथे छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती प्रतिष्ठापना वेळी काही समाजकंटकानी महाराजांबद्दल अपशब्द बोलून अडथळा निर्माण केला. त्यावेळी महाराष्ट्रातील दिनेश कदम यांनी महाराष्ट्रातून कर्नाटक मणगुत्ती येथे उपस्थिती दर्शवून जर कोणी महाराजांबद्दल अपशब्द बोलेल तर त्यांचे हात कलम केले जातील असे सोशल मीडिया वरती मजकूर टाकून मणगुती येथे उपस्थिती दर्शविली. त्यावेळी यमकनमरडी मराठी पोलिसांनी त्यांच्यावर कन्नड आणि मराठी भाषिकामध्ये द्वेष निर्माण करून शांतता भंग केला म्हणून त्यांच्यावरती भारतीय दंड संहिता 502 सह कलम दोन प्रकारे गुन्हा नोंद केला. त्याप्रकरणी दिनेश कदम यांच्या वतीने संकेशवर येथील कनिष्ठ दिवाणी न्यायालय व प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर जामीन अर्ज दाखल केला.तो अर्ज न्यायालयाने मंजूर करून दिनेश कदम यांचे 25 हजार रुपये चा वैयक्तिक bond व तेवढ्याच रकमेचा जामीन प्रत्येक तारखेला न्यायालयासमोर हजर राहणे साक्षीदारांना धमकाऊ नये अशा विविध अटी वरती त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला त्यांच्या वतीने ऑडवोकेट महेश बिर्जे हे काम पाहत आहेत त्यावेळी बेळगाव येथील वार्ड नंबर 14 चे नगरसेवक शिवाजी मंडोळ कर व युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके हे देखील हजर होते.