बेळगांव:द.म.शि.मंडळ बी.बी.ए महाविद्यालयात डिजिटल मार्केटिंग या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. श्री ओंकार दळवी हे संसाधन व्यक्ती लाभले होते. या प्रसंगी ओंकार दळवी बोलताना म्हणाले की जर तुम्ही आज आकडेवारी पाहिली तर बहुतेक व्यवसाय पारंपारिक मार्केटिंग ऐवजी डिजिटल मार्केटिंगवर जास्त खर्च करत आहेत. आजच्या जॉब मार्केटमध्ये डिजीटल मार्केटिंगला जास्त मागणी आहे. परंतु उमेदवारांची कमतरता आहे म्हणून तुम्ही सर्वांनी स्वतःला नोकरीसाठी सज्ज केले पाहिजे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.बसवराज कोळूचे अध्यक्षीय मनोगत मांडताना म्हणाले की आजच्या परिस्थितीत मार्केटिंगचे ट्रेंड रोज बदलत आहेत. पारंपारिक मार्केटिंगची जागा डिजिटल प्लॅटफॉर्मने घेतली आहे, ज्यामुळे आपल्याला स्वतःला अपडेट करण्याची गरज आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राखी चतुर् यांनी केले व आभार सिद्धार्थ भातकांडे याने केले.