सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुन्हा एका बाळंतिणीचा मृत्यू
बेळगाव जिल्ह्यात बाळंतीण महिलांच्या मृत्यूची मालिका सुरूच आहे. मंगळवारी सकाळी बिम्स रुग्णालयात आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. बेळगाव तालुक्यातील निलजी गावातील रहिवासी अंजली पाटील (वय 31) ही महिला बाळंतपणासाठी रुग्णालयात आली होती. प्रसुतीनंतर तिला मुलगी झाली. बाळंतपणानंतर कमी रक्तदाबाचा त्रास झाल्याने अंजलीचा मृत्यू झाला आणि उपचार अयशस्वी झाले. डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे.