धर्मवीर संभाजी राजे सारखा राष्ट्रासाठी त्याग आपला हातून ही घडावा-सागर श्रीखंडे
निपाणी मध्ये ३८-३९ अंशांच्या तापमानात शेकडो तरुण मुल मुली अनवाणी फिरतात एकचे जेवण करतात… मिष्टान खाणे, चहा पिणे,चित्रपट पाहत नाहीत… एकवेळचे जेवण करतात असे चित्र निपाणी तालूक्यात पहायला मिळत आहे. निमित्त आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदानमासाचे आज-शिरगुप्पी येथे बलिदान मास निमित्त आज 16व्या दिवशी रोज सायंकाळी गावातील तरुण तरुणी एकत्र येवून बलिदान मास पळून कानाकोपऱ्यात जागार करत आहे. बजरंग दलाचे सागर श्रीखंडे म्हणाले, शिवप्रतिष्ठान हिंदस्थान यांच्या वतीने २८ फेब्रुवारी ते २९ मार्चपर्यंत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदानमास पाळला जातो. हिंदवी स्वराज्यासाठी प्रचंड झुंज देणारे हिंदवी स्वराज्याचे दूसरे छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेब याने पकड़ाले पासून त्यांचा पाशवी छळ करून त्यांचा रोज एक-एक अवयव संपूर्ण महिनाभर तोड़त होते. रोज अंगाची साल सोलून काढली जात होती. फाल्गुन अमावस्या दिवशी पाय पासून डोक्या पर्यंत देहाचे शेवटी कुऱ्हाडीने तुकडे केले म्हणजे संभाजी महाराज महिनाभर मृत्युवच्या वाटेवर संपूर्ण महिनाभर धिरोदत्त पणे चालत होते.
म्हणूनच त्यांना फल्गुन शुध्द प्रतिपदेपासून फाल्गुन अमावास्येपर्यंत रोज सामाजिक, कौटुंबिक स्तरावर संपूर्ण महिनाभर प्रत्येक दिवशी श्रध्दांजली वाहिली जाते. २९ मार्च रोजी छत्रपती महाराज यांची न निघालेली अंत्ययात्रा काढली जाते. महाराष्ट्र सोबत कर्नाटक मध्येही दररोज सायंकाळी तरुण, तरुणी आपल्या आपल्या ठिकाणी एकत्र जमात व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर दररोज नतमस्तक होतात पूजन करतात महाराष्ट्र कर्नाटकातील अनेक गावा बलिदानभास पाळला जातो.
यावेळी तरुण तरुणीच्या मध्ये राष्ट्र भक्ती, धर्म भक्ती वाढण्यास मदत होते देव, देश, धर्मासाठी जगण्याची ऊर्जा मिळते आजच्या तरुण हा आपली देश भक्ती फक्त डॉल्बीवर नाचून, धुडकूस करून शोशल मीडिया फेसबुक, वॉट्सप, इंस्टावर, व्हिडिओ, रिल्स, स्टेटस ठेवण्या पुरता दाखवत असतो पण धर्मवीर बलिदान मास संपूर्ण महिभर पाळल्याने त्याचे आचार विचार शुद्ध होतात आणि देव, देश, धर्म कार्यासाठी कृतिशील तरुण तरुणीची फळी निर्माण होत आहे असे मत बजरंग दलचे सागर श्रीखंडे यांनी शिरगुप्पी येथे बलिदान मास निमित्त व्यक्त केले यावेळी प्रास्ताविक अक्षय रक्ताडे व सूत्रसंचालन अनिरुद्ध मोकाशी तर आभार संदेश तोरसकर यांनी मानले.
यावेळी गावातील मोरया Boys,श्री ओम गणेश मित्र मंडळ, धर्मवीर संभाजी महाराज नगर,शिवगणेश तरुण मंडळ, संघर्ष तरुण मंडळ, नागराज तरुण मंडळ,अवधूत फाउंडेशन, बिच्छू ग्रुप, युवाशक्ती तरुण मंडळ आणि सकल हिंदू समाज शिरगुप्पी या मंडळातील तरुणांनी सहभाग घेतला