येळळूरमध्ये धर्मवीर ज्वाला फेरी
बेळगाव, प्रतिनिधी:
येळ्ळूर येथील हिंदवी स्वराज्य युवा संघटना आणि येळ्ळूर ग्रामस्थ यांच्यावतीने नुकतीच धर्मवीर ज्वाला फेरी गावातून काढण्यात आली.
गावांमधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून या ज्वाला फेरीला प्रारंभ करण्यात आला. संपूर्ण गावभर ही ज्वाला फेरी काढण्यात आली. त्यानंतर चांगळेश्वरी मंदिर मध्ये ज्वाला नेऊन ठेवण्यात आली. त्यानंतर ध्येयमंत्र म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या ज्वाला फेरीमध्ये हिंदवी स्वराज्य युवा संघटनेचे पदाधिकारी आणि येळ्ळूर गावातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शनिवारी सकाळी सहा वाजता गावातून मूक पदयात्रा काढण्यात आली. मागील एक महिनाभर हिंदवी स्वराज्य युवा संघटना आणि ग्रामस्थांच्या वतीने बलिदान मास पाळण्यात आला.
*मराठा मंदिर तर्फे विद्यार्थ्यांसाठी सुविधा*