अगसगे गावात मध्ये १ कोटी ७० लाखाच्या विकास कामाचा शुभारंभ
बेळगाव: अगसगे गावात मध्ये १ कोटी ७० लाखाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करून एक कोटी सत्तर लाखाच्या अनुदानातून ६०० मीटर गटर व रस्त्याच्या डांबरीकरणाला चालना देण्यात आले.
याप्रसंगी अगसगे ग्रामपंचायतच्या वतीने प्रियंका जारकीहोळी यांचा निवडून आल्यानंतर पहिल्यांदा गावात आल्यामुळे पुष्पगुच्छ व शाल घालून सन्मान करण्यात आला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रियांका जारकीहोळी म्हणाल्या की बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी या भागाचा विकास केला आहे त्याचप्रमाणे मी सुद्धा केंद्रीय अनुदानातून ज्या सुविधा उपलब्ध होतील त्या उपलब्ध करून देऊन या भागाचे नंदनवन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष,उपाध्यक्ष,माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे, मंत्री सती जारकीहोळी यांचे अप्त सहाय्यक व के.पी सी सी सदस्य मलगौडा पाटील व मराठी व कन्नड शाळेच्या शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थित होते.