बेळगाव: कडोली जिल्हापंचायत भागातील बोडकेनट्टी गावामध्ये विविध विकास कामाला चालना देण्यात आली. कर्नाटक सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या विशेष निधीतून सीसी रोड मीटिंग बस स्टॅन्ड आणि स्ट्रीट लाईट या इतर सर्व कामांचे शुभारंभ करण्यात आले.आज मंत्री सतीश जारकीहोळी यांचे अप्त सहाय्यक व केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना केपीसीसी सदस्य म्हणाले की मंत्री सतीश जारकीहोळी व लोकसभा सदस्य प्रियांका जारकीहोळी यांच्या आदेशानुसार बोडकेनट्टी गावांमध्ये विकास कामाला चालना देण्यात आली आहे. गावच्या यात्रे यादी गावातील सर्व विकासकामे पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
याप्रसंगी गावातील ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.