अगसगे गावातील विकास कामाला जालना
बेळगांव:तालुक्यातील अगसगे गावातील विकास कामाला चालना देण्यात आली. बेळगाव जिल्हा पालकमंत्री व नगरविकास मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या सीसी रोड व पथदीपक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.३० लाखाच्या अनुदानातून सी.सी.रोड व पथदीपक बसवण्यासाठी ३५ लाखाचा निधी मंजूर झाला आहे.
मंत्री सतीश जारकीहोळी यांचे अप्त सहाय्यक व केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांच्या हस्ते कुदळ मारून कामाला चालना देण्यात आली. तसेच याप्रसंगी बोलताना म्हणाले की मंत्री सतीश जारकीहोळी या भागामध्ये अनेक विकासकामे केली आहे. त्याचप्रमाणे आता खासदार प्रियंका जारकीहोळी सुद्धा आणि विकास कामे करत आहेत. गावामध्ये काही समस्या असतील तर त्या लवकरच सोडवण्यात येतील असे आश्वासन यावेळी मलगौडा पाटील यांनी दिले.
तसेच ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने मलवाडा पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य आणि गावकरी उपस्थित होते.