सहकार भावनेतून गांवाचा विकास साध्य- डॉ. डी. एम .मुल्ला.
बेळगांव : धामणे येथे श्री ओंकारेश्वर मल्टीपर्पज सौहार्द सहकारी संघाची सभा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.या समारंभाला प्रमुख अतिथी आणि वक्ता म्हणुन बेळगांव मराठा मंडळ पदवी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. डी. एम. मुल्ला हे उपस्थित होते.तर विशेष अतिथी पदी पायोनियर बँकेचे संचालक शिवराज पाटील, वेदांत सौहार्द सहकारी संघाचे संदीप खन्नुकर ,हलगा ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष आणि धर्मराज मल्टीपर्पज सौहार्द सहकारी को-आँपरेटिव सोसायटीचे अध्यक्ष सदानंद बेळगोजी उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संघाचे अध्यक्ष किरण चतुर यांनी भूषविले होते.
प्रारंभी संघाचे संचालक शिवाजी चौगुले यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना प्रस्तुत करून उपस्थितांचे स्वागत केले.त्यानंतर धामणे ग्राम पंचायतीचे अध्यक्ष पंडित पाटील आणि उपाध्यक्ष अशोक पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून फोटो पूजन करण्यात आले.दीप प्रज्वलानंतर मान्यवरांचा अध्यक्ष किरण चतुर, उपाध्यक्ष रियाज कोडलवाड, संचालक उमेश डुकरे आणि भरमा चतुर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तद्नंतर संचालक शिवाजी चौगुले यांनी संघाच्या प्रगतीचा तपशील सर्वांच्या समोर मांडला. यावेळी गावांमधील प्राथमिक शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनी कार्य केल्याबद्दल मान्यवरांचा हस्ते भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी प्रमुख वक्त्ता च्या नात्याने बोलताना डॉ. डी.एम मुल्ला म्हणाले की, गावकऱ्यांचा उद्देश आपल्या गांवाला प्रगतिशील बनवणारा असला पाहिजे. ही प्रगती सहकार आणि सौहार्द भावनेतून निर्माण झालेल्या मदतीच्या रूपाने साध्य आहे.विशेष अतिथी पदावरून बोलताना शिवराज पाटील म्हणाले की, संघ संस्थांमध्ये गांवातील लोक आपला पैसा गुंतवून, त्याचा उपयोग आपल्या आणि आपल्या गांवासाठी केला पाहिजे.
यावेळी अन्य विशेष अतिथी सदानंद बेळगोजी, संदीप खन्नुकर यांची मार्गदर्शनापर भाषणे झाली.कार्यक्रमाच्या शेवटी संचालक अजित बाळेकुंद्री यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाला संघाचे संचालक, कर्मचारी, सभासद आणि गांवातील नागरीक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.