हवा उत्तर कर्नाटकचा विकास
शहरात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या पत्रकार परिषदेत गदग तोंटदार्य जगद्गुरु डॉक्टर सिद्धराम स्वामीजी यांनी उत्तर कर्नाटकाचा आपल्याला विकास हवा आहे अशी मागणी पत्रकार परिषदेत केली तसेच येणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात विशेष अर्थसंकल्प सादर करावा असे देखील सांगितले.
या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्दे मांडले यावेळी ते म्हणाले की अनेक वर्षांपासून आम्ही सरकार समोर अनेक मुद्दे मांडत आहे ते प्रत्यक्षात आले नाही ही वेगळी गोष्ट आहे मात्र सरकारने या अर्थसंकल्पात उत्तर कर्नाटकाचा विचार करावा.
त्यानंतर त्यांनी सुवर्ण सौध बद्दल ते म्हणाले की 400 कोटी रुपये खर्च करून सुवर्णसंधी बांधले गेले हे फक्त अधिवेशन दरम्यान उपयोगाचे आहे मात्र बाकीचे दिवस या ठिकाणी सुवर्णसौद रिकामी राहते त्यामुळे असे न करता सरकारने सरकारी कार्यालय या ठिकाणी स्थलांतर करावे असे सांगितले.
यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये असलेल्या कन्नड शिक्षण व रोजगारासाठी शासनाने आर्थिक मदत करावी शाळा महाविद्यालय या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावे तसेच सीमेवरील जिल्ह्यांना प्रतिउत्तर देण्याचे काम सरकारने करावे असे मत व्यक्त केले.
त्यानंतर त्यांनी कर्नाटकाच्या विविध भागात कोणकोणत्या सुविधा सुरू करता येतील तसेच कोणकोणत्या त्रुटी अनेक भागात आहेत याबद्दल सांगून त्या पूर्ण करण्याची मागणी यावेळी पत्रकार परिषदेत केली
या पत्रकार परिषदेत रायबाग येथील विरक्त मठाचे श्री शिवानंद स्वामीजी कारंजी मठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी नागनूरी मठाचे रुद्राक्ष मठाचे डॉक्टर आल्लम प्रभू, स्वामीजी कन्नडकृती समितीचे अध्यक्ष अशोक चंद्ररगी उपस्थित होते.