<span;>कोरिया येथे होणाऱ्या स्केटिंग स्पर्धेत देवेन बामणे करणार भारताचे प्रतिनिधित्व
बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचा स्केटर देवेन बामणे यांची आशिया स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पीड स्लॅलॉम प्रकारातील या निवडीसाठी चंदिगढ (मोहाली) येथे झालेल्या चाचणी स्पर्धेत देवेनने उत्कृष्ट कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवले आहे. सप्टेंबरमध्ये कोरियात होणाऱ्या या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
आर.एल.एस. कॉलेजचा विद्यार्थी देवेन गेल्या ८ वर्षांपासून स्केटिंगचे प्रशिक्षण घेत आहे. निवडीच्या चाचणीसाठी त्याने रात्रंदिवस मेहनत घेतली होती. प्रशिक्षक मंजुनाथ मंडोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कठोर सरावाचे हे यशस्वी परिणाम आहे. निवड झाल्यानंतर बेळगाव विमानतळावर त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले होते.
देवेनच्या यशाने कुटुंब आणि बेळगावच्या स्केटिंग समुदायाला गर्व वाटत आहे. विमानतळावर बेळगाव जिल्हा स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांनी पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी आई ज्योती बामणे, वडील विनोद बामणे, चौकसिंग पुरोहित, बसवराज कोरीशेट्टी, लीना कोरीशेट्टी, अविनाश कोरीशेट्टी उपस्थित होते.
देवेनने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक, कुटुंबीयांना दिले आहे. त्याने कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे सेक्रेटरी इंदूधर सीताराम, आर.एल.एस. कॉलेजचे प्राचार्य विश्वनाथ कामगोळ, बेळगाव जिल्हा स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर, सूर्यकांत हिंडलगेकर, शिवराज पाटील यांच्यासह सर्वांचे आभार व्यक्त केले.
सप्टेंबरमध्ये कोरियात होणाऱ्या आशिया स्पर्धेत देवेन बामणे भारताच्या ध्वजाखाली स्पर्धा करणार आहे. बेळगावकरांसह देशामध्ये त्याच्या यशासाठी शुभेच्छा देत आहेत.
यावेळी देवेन बामणे यांचे वडील विनोद बामणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपला मुलगा हा आंतरराष्ट्रीय खेळाडू झाला पाहिजे अशी आमची लहानपणापासून आमची इच्छा होती. आणि आपल्या बेळगावचे नावलौकिक करावे. आज राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळवून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. लवकरच चीन आणि कोरिया मध्ये होणाऱ्या स्केटिंग स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. याचा मला खूप आनंद होत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.https://dmedia24.com/killing-retired-dgp-om-prakash-in-bengaluru/
याप्रसंगी बेळगाव रोरल स्केटिंग असोसिएशनचे सूर्यकांत हिंडलगेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की देवेन बामणे हा चांगला मेहनती खेळाडू आहे.आज त्याच्या मेहनतीला फळ मिळाले आहे. तो आपल्या भारत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.याचे मला आमच्या असोसिएशनसाठी गर्वाची गोष्ट आहे.