मारुती गल्लीमधील निराधार वृद्ध महिलेला हलविले बिम्स मध्ये
श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेला आज मारुती गल्ली येथे एक वृद्ध आणि निराधार महिला आढळली. यावेळी या वृद्ध महिलेची अवस्था पाहून श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेचे कार्यकर्ते यांनी त्या वृद्ध महिलेला मदत देऊ केली आहे.
यावेळी त्यांनी खडे बाजार पोलिसांशी संपर्क साधून त्या महिलेची रवानगी बीम्स इस्पितळात केली. यावेळी नारू नीलजकर अवधूत तुडयेकर आणि आतिश धातोंबे उपस्थित होते.