प्रशासनाचा दबाव -परवानगी असतानाही समितीचा फलक काढला
खानापूर रस्त्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यालय आहे.या कार्यालयावर रीतसर परवानगी घेऊन समिती कार्यालयाचा फलक लावण्यात आला होता.यापूर्वीही तीन वेळा करण्याचा प्रयत्न निवडणूक अधिकाऱ्यांकडून झाला होता.
मात्र आज प्रचंड पोलीस बंदोबस्तात निवडणूक अधिकाऱ्यांनी हा फलक काढून जप्त केला. त्यामुळे संतप्त झालेल्या समिती कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
यावेळी समिती कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून विरोध केला. परिसर परवानगी घेऊन सुद्धा महाराष्ट्र एकीकरण समितीवर अशा प्रकारची कारवाई करून नेहमी गालबोट लावण्यात येतो यामध्ये मराठी माणसांच्या भावना दुखावल्या जातात.
कानडीगांनी जे काही केले तरी चालेल मात्र बेळगावच्या सीमा भागात मराठी माणसाने परवानगी घेऊन फलक लावला तरी त्यांच्यावर कारवाई करून आणि गुन्हे दाखल करण्यात येतात.
त्यामुळे आज संतप्त झालेल्या समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून ठिया आंदोलन केले आणि जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली. या आधी निवडणूक अधिकारी दिलेले परवानगी पत्र ही यावेळी दाखवण्यात आले.
मात्र निवडणूक अधिकारी अनुराधा वस्त्राद यांनी कारवाई करण्यात आलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांना दमदाटी देऊन प्रथम फलक जप्त करण्याचा आदेश दिला मात्र पुन्हा त्यांनी कोणाच्या तरी दबावाखाली फलक जप्त केला. त्यामुळे समिती कार्यकर्त्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे