उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून या तिघांच्या नावाचा प्रस्ताव सचिवालयाला सादर…
नुकत्याच झालेल्या मुंबई भेटी दरम्यान ठाणे येथे आनंद आश्रम मध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांची महाराष्ट्र एकीकरण समिती सीमाभाग वैद्यकीय समन्वयक प्राचार्य श्री आनंद आपटेकर व मध्यवर्ती समितीचे सक्रिय कार्यकर्ते श्री विकास कलघटगी यांनी भेट घेऊन कोल्हापूर येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिस्तमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन दिले होते त्याची एक प्रत सुपूर्द केली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना लवकरात लवकर सीमा समन्वयक मंत्र्यांची नियुक्ती व्हावी या संदर्भात चर्चा झाली.
त्या वेळेला बेळगाव व सीमाभागाशी जवळीक असलेल्या मंत्रिमंडळातील व्यक्तींना सीमा समन्वयक पदी नियुक्ती करा अशी विनंती करण्यात आली . उपमुख्यमंत्री मा. श्री शिंदे साहेबांनी नागपूर येथे शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष श्री रणजीत चव्हाण पाटील व समितीने नेते श्री रमाकांत दादा कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली सीमाभागातील समितीच्या शिस्तमंडळाने भेट घेऊन हीच मागणी केली होती हे लक्षात येताच त्यांनी लगेच आपल्या सरकारी स्वसहायक यांना त्वरित स्वअक्षरी शेरा लिहून प्रस्ताव पुढे पाठवण्यात सांगितले आणि त्या पत्रावरती कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्य मंत्री श्री प्रकाश अबिटकर व साताऱ्याचे पालकमंत्री व खनिज मंत्री शंभूराजे देसाई आणि चंदगडचे आमदार श्री शिवाजीराव पाटील या तिघांच्या नावाचा प्रस्ताव स्वअक्षरी सचिवालयाला पाठवला. याविषयी लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले.