मच्छे व उपनगरात पावसाळ्यात डासांची झपाट्याने वाढ झाल्याने सगळीकडे डेंग्यु आणि चिकणगुणिया झालेले अनेक रुग्ण पहावयास मिळत आहेत त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी *पिराजी मेडिकल, हुंचेनहट्टी व महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या* संयुक्त विद्यमाने मच्छे येथील कलमेश्वर मंदिर व हावळ नगर येथील दत्त मंदिर येथे लसीकरण मोहीम राबविण्यात आली. युवा समितीचे अध्यक्ष श्री अंकुश केसरकर व कार्याध्यक्ष सचिन केळवेकर यांच्या हस्ते लसीकरणास प्रारंभ झाला.
या उपक्रमाचा मच्छे भागातील हजारों नागरिकांनी, विशेषतः लहान मुलांनी या लसीकरणाचा लाभ घेतला.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सुशांत कणबरकर, शुभम कणबरकर, गजानन छप्रे, अमोल लाड, सागर कणबरकर, कृष्णा अनगोळकर, सिद्धार्थ चौगुले, नारायण अनगोळकर, सूरज लाड, मारुती भातकांडे, संभाजी कणबरकर, बजरंग धामणेकर, नागराज बाळेकुंद्री, साईनाथ शिरोडकर व रोहिणी कणबरकर, गिरीश मठपती, साहिल बेळगावकर आणि अमृत पाटील आदींनी परिश्रम घेतले.