समर्थनगर येथे डेंग्यू आणि चिकनगुनिया प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम
गेल्या बारा वर्षापासून श्री एकदंत युवक मंडळ समर्थनगर आणि डॉक्टर प्रकाश राजगोळकर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील नागरिकांना डेंग्यू आणि चिकनगुनिया प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे.
डॉक्टर प्रकाश राजगावकर यांच्या विशेष प्रयत्नातून गेल्या बारा वर्षापासून समर्थ नगर मध्ये हे शिबिर राबविण्यात येत असून या शिबिरामध्ये डॉक्टर लसीकरणाच्या आधी या रोगावर घ्यावयाचे दक्षता यावर नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत.
यावेळी या शिबिराची सुरुवात छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आली त्यानंतर डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉक्टरांनी पावसामध्ये आपली आरोग्याची काळजी कशाप्रकारे घेतली पाहिजे आपल्या स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबाची जबाबदारी देखील ही आपण घेतली पाहिजे असे सांगून सर्वांना लसीकरणाचा डोसिला यावेळी या भागातील महिला मंडळ युवक मंडळ बाल युवक तसेच वृद्ध आणि नागरिक उपस्थित होते.