बेळगाव:ग्लोब थेटर कॉर्नर आणि गांधी स्मारक या ठिकाणावरून नेहमीच अवजड वाहनांची वाहतूक सातत्याने होत असते. या भागामध्ये अनेक शाळा आणि रहिवासी वसाहती आहेत. या भागातून अनेक वाहनांची ये- जा होत असते. त्यामुळेच येथे वारंवार अपघात होत आहेत. यामुळेच नागरिकांकडून अवजड वाहनांची वाहतूक रोखण्याची मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत कॅन्टोन्मेंटने या भागांमध्ये लोखंडी बॅरेल उभारले आहेत. असे असले तरी या बॅरेलमुळेच अपघात होत आहेत. त्यामुळे या भागातील बॅरेल त्वरित हटवण्याची मागणी येथील नागरिकाकडून वारंवार करण्यात येत आहे.
कॅन्टोन्मेंटने येथील अवजड वाहतूक रोखण्यासाठी रस्त्यांवर आता लोखंडी बॅरेल ठेवले आहेत. मात्र हेच बॅरेल आता अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. हे बॅरेल चुकविताना दुचाकी, चारचाकी वाहनांचे अपघात होत आहेत. खासकरून शाळेच्या वेळेमध्ये मोठी गर्दी होत असल्याने याचा त्रास विद्यार्थ्यांना होत आहे. त्यामुळे हे बॅरेल त्वरित हटवण्याची मागणी नागरिक करत आहेत.