बेळगांव: मंगळवारी खादरवाडी जैतनमाळ कमिटीने पोलीस आयुक्तांची येडा मार्टिन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये गेल्या १ वर्षापासून ४२ एकर जमिनी विकली गेली आहे.त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे.या प्रकरणाची चौकशी झाली असे खोटे आरोप करत शेतकरी संघटना गावकऱ्यांना भ्रमित करत आहे.
तसेच गावतील नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण करून गावातील नागरिकांना भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही शेतकरी संघटना गावातील थोड्या लोकांचा व स्थानिक राजकारणी यांचा पाठिंबा घेऊन आमच्यावर अन्याय करून धमकी देत असल्याचे या निवेदनाद्वारे पोलीस आयुक्तांना सांगितले.
तसेच आम्ही या प्रकरण संदर्भात वेळोवेळी पोलीस स्थानकात फिर्याद देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. तसेच शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जैतनमाळ कमिटीच्या सदस्यांच्या घरासमोर घरी कोणीही पुरुष नसताना बायकांसमोर शिवीगाळ करणे,आरडाओरडा करणे, तुमचे घर जाळतो व जीवे मारण्याची धमकी देत आहेत. त्यासाठी आम्हाला सुरक्षा द्यावी व या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.अशा चुकीचा अफवा पसरून गावातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न ही नूतन शेतकरी संघटना व त्यांचे कार्यकर्ते करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.यांच्या राकेश यल्लाप्पा पाटील, राजेश यल्लाप्पा पाटील, विशाल पाटील,अनिल अशोक बिर्जे, रमेश बाबुराव माळवी विरोधात तक्रार केली.
याप्रसंगी जैतनमाळ समितीचे सदस्य बाळाराम कडलीकर,बाळू पिंगट,अनिल मालवी,विशाल धामणेकर,महादेव शिवांगेकर,आप्पाजी गोरल,शंकर शिवांगेकर,बाळू बस्तवाडकर,पिराजी डोळेकर,बाळू धामणेकर,मनोहर कडलीकर,कल्लाप्पा पाटील,परशराम पाटील,मारुती बस्तवाडकर,निगप्पा मालवी,रोहिदास पाटील,सहित ग्रामस्थ उपस्थित होते.