येथील रस्ता करून देण्याची मागणी
कंग्राळी बुद्रुक येथील लक्ष्मी गल्लीच्या पाठीमागे नागराज हुरूडे यांच्या घरासमोरील गल्लीतील घरे बांधून दहा ते बारा वर्षे झाली आहेत. सदर गल्लीच्या रस्त्याचे साधे खडीकरणही न झाल्यामुळे पावसाळ्यात गुडघाभर चिखलातून वाट शोधत गल्लीतील नागरिकांना घराकडे जावे लागते.
त्यामुळे लक्ष्मी गल्लीच्या पाठीमागील नागराज हुरूडे यांच्या घरासमोरील गल्लीतील रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करून नागरिकांना दिलासा देण्याच्या मागणीचे निवेदन ग्रा. पं. अध्यक्षा कौसरजहाँ सय्यद, उपाध्यक्षा दीपा पम्मार यांच्या अनुपस्थितीत ग्रा.पं. सदस्य जयराम पाटील यांच्याकडे देण्यात आले.
येथील नागरिकांना दुचाकी व चारचाकी वाहनेसुद्धा सध्या दुसऱ्यांच्या घरी पार्किंग करावी लागत आहेतत्यामुळे समस्या निर्माण झाली असून भांडण देखील होत आहेत .
त्यामुळे ग्रा. पं. ने दीपावलीनंतर सदर रस्त्याचे प्रथम खडीकरण तसेच डांबरीकरण करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी धाकलू कागणकर, कृष्णा पाटील, किरण कागणकर, बसवंत कागणकर, महेश कागणकरसह गल्लीतील नागरिक उपस्थित होते.