<span;>बेळगांव:तालुक्यातील पश्चिम भागात उगमस्थान असणारी मार्कंडेय नदी 12 महीने प्रवाहती करून पश्चिम भागातील शेत जमीन वर्षभर<span;> ओलिताखाली ठेवून हरित क्रांती घडवून आणण्याच्या शाश्वत विचाराने ‘तिलारी धरण महाराष्ट्र’ कालव्याने नदीला जोडण्यासंबंधीचा स्थानिक शेतकरी वर्ग, तुडये-पंचायत सदस्य तसेच सिमालगत गावकरी व,स्थानिक प्रतिनिधीना सोबत घेवून प्रस्ताव सादर करून शेतकर्यांच्यावतीने पुढाकार घेऊन बेळगांवचे खासदार जगदीश शेट्टर यांच्याशी चर्चा करुन बेळगांवचे माजी महापौर श्री शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील विविध भागातील पंचायत सदस्य , कडून निवेदन सादर करण्यात आले.
<span;>यावर खासदार जगदीश शेट्टर यांनी सांगितले की, चंदगडचे स्थानिक आमदार श्री राजेश पाटील यांच्यासोबत तसेच राज्यस्तरीय उच्चाधिकार्यांसोबत बैठक घेऊन विचार विनिमयाने,समन्वयाने हे काम मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
<span;>यावेळी पुंडलिक मोरे, पुंडलिक पावशे, निंगाप्पा जाधव, किसन सुंठकर, सुरेश अगसगेकर, माजी नगरसेवक नगरसेवक अनिल पाटील,महांतेश कोळुचे, उमेश नाईक,ग्रामपंचायत सदस्य मारुती सुतार, वैजनाथ बेन्नाळकर आदी उपस्थित होते.