आमची जमीन आम्हाला द्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
आज विश्वशांती मानवाधिकार मिशन यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात त्यांनी अनुसूचित जाती जमातीच्या निवासतांवर झालेल्या अन्यायाबाबत न्याय मागितला आहे.
बेळगाव तालुक्यातील वाघवडे गावात अनुसूचित जाती जमातीच्या निवासांवर 488 एकर एक गुंठा जमिनीच्या संदर्भात झालेल्या अन्यायाबाबत सर्वांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे न्याय मागितला यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्रीशैल परगी यांनी निवेदनाचा स्वीकार केला.
या निवेदनात त्यांनी वाघवडे गावातील सर्वे नंबर 167/2 अ मध्ये 1987 पूर्वीच्या अतिक्रमणात समाविष्ट असलेली 487 एकर जमीन बेळगावच्या अनुसूचित जाती जमाती वडपुरी पुनर्वसन केंद्र बेळगाव यांना देण्यात आलेली नाही व गेल्या 40 वर्षापासून त्याची मागणी पूर्ण न केल्याने अन्याय झाल्या असल्याचा आवाज उठविला आहे.
त्यामुळे आपल्या या मागणीबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी विनंती दत्ता बिलावर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे