अलतग्याला वस्तीचे बस सोडा: कंग्राळी खुर्द ग्रा पं कडून मागणी
बेळगांव :गेल्या 6 महिन्यापासून बेळगाव सीबीटी ते व्हाया अलतगा हंदिगनूर बस सेवा अचानकपणे बंद केली आहे. त्या साठी प्रामुख्याने कंग्राळी व अलतगा ज्योतीनगर परिसरातील शेकडो विद्यार्थी, कामगार, भाजी विक्रेते यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याबरोबर अलतगा येथील लोकांना जवळपास 1 ते 1. 50 किलोमीटर पाऊसाळा उन्हाळा न बघता पायपीट करावा लागत आहे. त्यामुळे अलतगा गावाला कायमस्वरूपी बस सेवा सुरळीत करावी अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायतकडे करण्यात आले आहे.
काही दिवसापूर्वी कंग्राळी ग्राम पंचायत अध्यक्ष आपल्या स्वतःच्या कामाला जातेवेळी जवळपास 50 ते 60 विद्यार्थी बस स्थानकावर बसची वाट बघत होते. तर कोणतीही बस थांबवत न्हवते. त्या वेळी स्वतः अध्यक्षांनी बस थांबवून सर्व विद्यार्थ्यांची सोय करून विद्यार्थ्यांची व्यथा जाणून घेतले. व चार दिवसात स्वतंत्र बस ची व्यवस्था करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यासाठी जनतेची समस्या सोडवण्यासाठी आपले शिष्टमंडळ सोबत कर्नाटक राज्य परिवहनअलतग्याला वस्तीचे बस सोडा, अशी मागणी कंग्राळी खुर्द ग्रा पं कडे करण्यात आली आहे.
दरम्यान सध्या राज्य सरकारने महिलांसाठी मोफत प्रवास सुरू केला आहे. मात्र याचा फायदा अलतगा कंग्राळी व ज्योती नगर येथील महिलांना होताना दिसत नाही. कारण या ठिकाणी बस नसल्याने सर्व काही वडाप व इतर वाहनांवरच अवलंबून आहे. याची माहिती यापूर्वी परिवहन मंडळाला दिली होती. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. आता तातडीने यासाठी पाऊल उचलण्याची गरज ही निवेदनात व्यक्त केली आहे.
राज्य परिवहन मंडळाचे व्यवस्थापक अनंत शिरगुपकर यांना व जिल्ह्याचे अधिकारी डीटीओ के के लमाणी यांना सीबीटी ते अलतगा कायमस्वरूपी वस्तीचे बस सोडण्याची मागणी करण्यात आलेली आहे. या वेळी ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील ग्रामपंचायत सदस्य चेतक कांबळे, प्रशांत पाटील, राकेश पाटील, वैजनाथ बेन्नाळकर, विनायक कम्मार, यशोधन तुळसकर, चेतन हिरेमठ आदी उपस्थित होते.
मलगौडा पाटील यांचा पुढाकार(कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य श्री मालगौडा पाटील यांनीही परिवहन मंडळाचे डीटीओ श्री लमाणी यांना संपर्क साधून अलतग्याला वस्तीचे बस सोडण्याची विनंती केली व श्री लमाणी यांनी 4 दिवसामदे बस सोडण्याचे आश्वासन दिले. हि बातमी समझताच विद्यार्थी व कामगार, भाजी विक्रेते व महिला वर्गामधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. )