मृत्युमुखी पडलेल्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी
बेळगांव: मंगळवारी पुन्हा एकदा बिम्समध्ये बाळंतपणानंतर आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आहे.आमच्या वारंवार निषेधानंतरही कर्नाटक काँग्रेस सरकारकडून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुरेशी खबरदारी आणि सुविधा पुरवल्या जात नाहीत.
बिम्समध्ये नवीन सुसज्ज रुग्णालय सुरू करण्याऐवजी डॉक्टरांना बळीचा बकरा बनवण्यात व्यस्त आहेत.
कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी त्वरित कारवाई करावी.सरकारी रुग्णालयांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व गर्भवती महिला आणि मृत नवजात बालकांना न्याय देण्याची डॉ सोनीली सरनोबत यांनी मागणी केली.