This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*हाॅकी ॲस्ट्रोटर्फ मैदान पू्र्ततेची नगर विकास मंत्र्यांकडे मागणी*

*हाॅकी ॲस्ट्रोटर्फ मैदान पू्र्ततेची नगर विकास मंत्र्यांकडे मागणी*
D Media 24

हाॅकी ॲस्ट्रोटर्फ मैदान पू्र्ततेची नगर विकास मंत्र्यांकडे मागणी

बेळगाव ः बेळगावने भारताला चार ऑलिंपिक हाॅकी खेळाडू दिले परंतु कर्नाटक शासनाने बेळगावसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे हाॅकी मैदान अद्याप दिलेले नाही, तसेच बुडाच्या सर्व साधारण बैठकीत 2020 मध्ये कणबर्गी येथे 8 एकर जागा मंजुरीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे परंतु यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने हाॅकी बेळगाव संस्थेची ॲस्ट्रोटर्फ मैदानाची मागणी पूर्णत्वास न्यावी असे निवेदन संस्थेतर्फे पदाधिकारी विकास कलघटगी यांनी कर्नाटक शासनाचे नगर विकास मंत्री मान. बी. एस. सुरेश यांना दिली.
मंत्री बी एस सुरेश यांनी ॲस्ट्रोटर्फ हाॅकी मैदानाची प्रलंबित मागणीची त्वरित पूर्तता करण्याचे आश्वासन बेळगाव हाॅकी पदाधिकार्याना सुवर्ण विधान सौध सभागृहात दिली.

आमदार राजू सेठ यांनी मंत्री महोदयांना ॲस्ट्रोटर्फ हाॅकी मैदानाची प्रलंबित मागणीची त्वरित पूर्तता करावी अशी विनंती केली.बेळगांव हे हाॅकी प्रेमींचे माहेर घर आहे. आज जिल्ह्यात 500 हून अधिक खेळाडू हाॅकीचा नित्यनेमाने सराव करीत आहेत, परंतु ॲस्ट्रोटर्फ मैदानाची कमतरता असल्याने राष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे अशी माहिती सचिव सुधाकर चाळके यांनी सांगितली.

यावेळी नगर प्रशासन मंत्री रहीम खान, नगर प्रशासन खाते संचालिका एल मंजुश्री, आमदार विश्वास वैद्य, आमदार गणेश हुक्केरी, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंडी, सचिव सुधाकर चाळके, प्रकाश कालकुंद्रीकर आदी उपस्थित होते.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply