नरेगा योजनेअंतर्गत किमान १०० दिवस काम देण्याची मागणी
बेळगांव:महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (नरेगा) काम करणाऱ्या महिला कामगारांनी सोमवारी जिल्हा पंचायत कार्यालयासमोर निदर्शने करून आंदोलन केले.कंग्राळी बि.के. ग्रामपंचायत हद्दीतील नरेगा मजुरांनी “किमान १०० दिवस काम देण्यात यावे, तसेच पगार वेळेत खात्यात जमा करण्यात यावा” अशी मुख्य मागणी करत जिल्हा पंचायत कार्यालयासमोर आंदोलन छेडले.
आंदोलक महिलांनी सांगितले, “नरेगा योजनेत काम करत असूनही आम्हाला वर्षातील किमान १०० दिवस काम उपलब्ध होत नाही. शिवाय, केलेल्या कामाचा पगारही महिनाओघून खात्यात पडत नाही. सरकारने हक्काचे आश्वासन दिले आहे, पण प्रत्यक्षात आमच्यासारख्या शेतमजुरांवर अन्याय होत आहे.”त्यासाठी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी करण्यात आली.https://dmedia24.com/production-%e0%a5%a7-a-vivid-display-of-womens-empowerment-by-the-new-disha-foundation/
कंग्राळी बी.के. ग्रामपंचायतीत गेल्या काही महिन्यांपासून नरेगा योजनेअंतर्गत कामाचे दिवस अनियमितपणे दिले जात आहेत, अशी तक्रार आंदोलकांनी नोंदवली. “कधी १५ दिवस, कधी २० दिवस अशी चांगलीच फरफट चालू आहे. शिवाय, पगारासाठीही आम्हाला पंचायत कार्यालयामध्ये एक सारखे जावे लागते,” अशी आर्तहाक आंदोलनात उमटली.या प्रश्नावर पिडीओ व तहसीलदार यांना अर्जही दाखल केले, पण कोणतीही अमलबजावणी झाली नाही, असे सांगितले गेले.
जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या लिखित स्वरूपात मागवल्या असून, “तक्रारींची तपासणी करून योग्य कारवाई केली जाईल,” असे आश्वासन दिले आहे. मात्र, महिला कामगारांचा आग्रह आहे की, “आमच्या कामाचे दिवस वाढवले जावेत आणि पगाराची प्रक्रिया पारदर्शक व्हावी.” यावेळी (नरेगा) महिला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .