आज नवीन गुडशेड रोडचे रहिवासी आणि व्यापारी यांनी L&T च्या चालू कामामुळे त्यांना होत असलेल्या समस्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी येथील रहिवाशांनी असे सांगितले की 1 महिना झाला आहे ,काम चालू आहे आणि साइटवर कोणतेही फलक नाहीत, L&T चे कामगार नाहीत.
ते काम अर्धवट सोडून दुसर्या प्रोजेक्टवर जात आहेत.यामुळे अनेक ट्रक अडकले आहेत आणि नवीन रस्त्यावर अनेक अपघात घडत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी अॅलन विजय मोरे यांनी नेतृत्व करत सर्व रहिवाशांना एकत्र केले आणि सुरू असलेल्या समस्या आणि निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल माहिती दिली.आणि तीव्र नाराजी व्यक्त केली.