बेळगाव:डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चार महिन्यांच्या गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी बुधवारी (दि:९/०९/२०२४) करत खडेबाजार पोलीस स्थानकासमोर आक्रोश व्यक्त केला.
बेळगाव तालुक्यातील कंग्राळी गावातील आरती चव्हाण वय (३२) असे गर्भवती आईचे नाव आहे. याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी आरतीला मंगळवारी सकाळी पोटात दुखत असल्याने गोंदळी गल्ली येथील आदर्श रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.२५ हजार पैसे भरल्यानंतर सकाळी अकरा वाजता डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली.आरतीने डॉक्टरांना सांगितले होते की माझ्या पोटामध्ये चार महिन्याचे बाळ आहे.
शस्त्रक्रियेच्या दोन तासांनी आरतीच्या पोटामध्ये तीव्र वेदना सुरू झाल्या यावेळी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उपस्थित नव्हते.यासाठी डॉक्टरांच्या सहकाऱ्यांनी गर्भवती आरती वर उपचार केला. त्यानंतर सायंकाळी ५ च्या दरम्यान डॉक्टर हॉस्पिटलमध्ये आले. यावेळी आरतीची बीपी खूप कमी झाली होती.
रुग्ण वाचणार नाही असे त्यांना समजतच त्यांनी लगेच केएलई रुग्णालयात धाव घेतली. आरतीला केएलई रुग्णालयात हलवत असतानाच वाटेतच गर्भवती आरतीचा मृत्यू झाला.रूग्ण ३ तास रूग्णालयात त्रस्त होता मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आरतीच्या कुटुंबीयांनी रुग्णालय आणि डॉक्टरांविरोधात संताप व्यक्त केला.
बुधवारी खडेबाजार पोलिस ठाण्याजवळ कुटुंबीय जमले.रुग्णालय आणि डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली. ही घटना खडेबाजार पोलीस ठाण्यांतर्गत घडली.