सिलेंडरच्या गळतीने गंभीर जखमी झालेल्या कुटुंबीयातील एकाचा मृत्यू
गांधी नगर सुभाष गल्ली येथे गॅस सिलेंडरच्या गळतीने आगीचा भडका लागून गंभीर जखमी झालेल्या कुटुंबीयातील एकाचा मृत्यू झाला आहे. बस चालक मंजुनाथ अथनी वय 40 यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नीची प्रकृती अद्यापही गंभीर अवस्थेत आहे.
कामाला जाण्यापूर्वी चहासाठी गॅस पेटवत असताना आगीचा भडका उडून अतिनी कुटुंबातील चौघेजण गंभीर जखमी झाले होते यामध्ये कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला असून आणि तिघा जणांची प्रकृती गंभीर आहे.
पत्नी लक्ष्मी वय 36 यांची प्रकृती चिंताजनक असून मुलगी आणि मुलग्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले सदर घटनेची नोंद माळ मारुती पोलीस स्थानकात झाली असून पोलीस तपास करत आहेत.