विजेच्या धक्क्याने बाप लेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील उडीकेरी गावात घडली.
सकाळी घरासमोरील कचरा काढताना प्रभाकर मल्लेशाप्पा हुंबी (७५) यांचा विजेच्या खांबाला स्पर्श झाला आणि त्यांना विजेचा धक्का बसला.धक्का लागून ते झाली कोसळले .ते पाहून त्यांचा मुलगा मंजुनाथ प्रभाकर हुंबी हा त्यांना वाचवण्यासाठी गेला.वडिलांना धरल्यावर त्यालाही विजेचा धक्का बसला आणि तो बाजूला उडून पडला.प्रभाकर यांचा जागीच मृत्यू झाला.
मंजुनाथ जिवंत असल्याचे पाहून त्याला ग्रामस्थांनी त्वरित त्याला सरकारी रुग्णालयात नेले पण तेथे त्याचा मृत्यू झाला.गेल्या काही दिवसापासून विद्युतभारीत तारा लोंबकळत असून विजेच्या खांबांना त्याचा स्पर्श होत असल्याची ग्रामस्थांनी वीज पुरवठा कंपनी हेस्कॉमकडे केली होती.पण हेस्कॉम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने बाप मुलाला नाहक जीव गमावावा लागला. दोडवाड पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.मृतांच्या कुटुंबीयांना मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.