बेळगाव : कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकर वाटच्या वतीने 20 मार्च रोजी चौदार तलाव चळवळ महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. करिता सर्किट हाऊस येथे पूर्वतयारीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी कर्नाटक दलित संघर्ष समितीचे राज्य खजिनदार सिद्धाप्पा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक घेण्यात आली.
बैठकीमध्ये ठरविण्यात आले की चौदार तलाव चळवळ महोत्सव 20 मार्च रोजी आंबेडकर उद्यान येथे साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाला हजारोच्या संख्येने दलित बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी सिद्धाप्पा कांबळे यांनी दिली.
यावेळी कर्नाटक दलित संघर्ष समितीच्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. संघटनेला अनेक पद्धतीने सहाय्य केलेल्या नारायण पाटील, नामदेव बाचीकर, जयवंत बाळेकुंद्री यांचा सन्मान सिद्धाप्पा कांबळे तसेच जिल्हा अध्यक्ष महानतेश तळवार यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच यावेळी दलित संघर्ष समिती आंबेडकर वादच्या जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.