मुसळधार पावसामुळे बेळगाव शहरातील अनेक भागातील घरात पाणी शिरल्याने जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
मुसळधार पावसामुळे अनेक भागात रस्त्यावर पाणी तुंबून घरात देखील पाणी शिरल्याने गृहोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.घरातील फ्रिज आणि अन्य वस्तू उंचावर ठेवाव्या लागल्या आहेत. ड्रेनेजचे पाणी घरात शिरल्याने घरात दुर्गंधी पसरल्याने घरात थांबणे देखील लोकांना त्रासदायक झाले आहे.
अनेक नवीन वसाहतीत गटारी नसल्याने पाणी वाहून जाण्यास मार्ग नसल्याने पाणी रस्त्यावर तुंबून घराघरात शिरले आहे.घरात तीन चार फूट पाणी साठल्याने अनेक कुटुंबांनी आपला मुक्काम वरच्या मजल्यावर हलवला आहे. विणकर समाजाची वस्ती असलेल्या भागात देखील घरात पाणी शिरल्याने सुत आणि साड्या भिजून विणकराना आर्थिक फटका बसला आहे.बेळगावातील राघवेंद्र कॉलनी,शांतीनगर,गजानन महाराज नगर या बरोबर वडगाव,खासबाग भागात अनेक घरात पाणी शिरले आहे.