सी एस इ टूर्नामेंट ट्रॉफी कॉलेज मर्यादित आयोजित करण्यात आलेले होती. श्री रामलिंगेश्वर मैदानावर मराठा स्पोर्ट्स तसेच एस जी बी आय ह्या दोन टीम मध्ये अंतिम सामना पार पडला त्यामध्ये मराठा स्पोर्ट्स संघाने विजय मिळविला प्रथम बॅटिंग करतेवेळी मराठा स्पोर्ट्स संघाने एस जी बी आय संघाला ६२ धावांचं आव्हान दिलं होतं,
ते आवाहन एस जी बी आय संघाला ५ ओव्हर मध्ये पूर्ण करता आले नाही, मराठा स्पोर्ट्स ने ३९ धावांनी एस जी बी आय संघावर विजय मिळविला आणि सी एस इ टूर्नामेंट ट्रॉफीचे मानकरी ठरले तसेच श्रीराम सेना हिंदुस्तानचे अनगोल प्रमुख श्री उमेश कुर्याळकर उर्फ पप्पूदादा व सचिन सुतार यांच्या हस्ते मराठा स्पोर्ट्स संघाला ट्रॉफीचे वितरण करण्यात आले तसेच ३००० रुपयांचे पारितोषक देण्यात आले.
तसेच उपविजेता म्हणून एस जी बी आय संघाला शिवाजी पाटील आणि रतन यांच्या हस्ते ट्रॉफी आणि पंधराशे रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले, तसेच मारुती उंदरे सचिन भिंगार्डे यांच्या हस्ते बेस्ट बॉलर बेस्ट बॅटमॅन यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.श्रीराम सेना हिंदुस्तानचे अनुकूल प्रमुख पप्पूदादा यांनी दोन्ही टीमचे हार्दिक अभिनंदन केले.आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि सीएससी टूर्नामेंट आयोजकांचे आभार मानले.